Sunday, September 28, 2025

मराठवाडा वॉटर ग्रीड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मराठवाडा वॉटर ग्रीड

दुष्काळी मराठवाड्याचा इतिहास,
अतिवृष्टीने बदलून टाकला आहे.
रांगड्या मराठवाड्याचा भूगोलही,
अतिवृष्टीने कुदलून टाकला आहे ?

मराठवाड्याचे कोरडे दुःख,
महापुरात ओले होऊन वाहू लागले.
मराठवाड्यातील कवी लोक,
आता महापुराच्या कविता लिहू लागले.

इथली पोकळ राजकीय इच्छाशक्ती,
आता जणू निसर्गाने जाणली आहे !
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना,
निसर्गानेच प्रत्यक्षात आणली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9049
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28सप्टेंबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...