Thursday, September 25, 2025

मदतीची जाहिरात...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मदतीची जाहिरात

कुणी खरोखर मदत केली,
कुणी फक्त मदतीची बात केली.
ज्याला जशी जमेल तशी त्याने,
आपल्या मदतीची जाहिरात केली.

मदतीपेक्षा राजकारणाचाच,
जिकडून तिकडून सूर आहे.
मदतीच्या जाहिरातीचाच,
सोशल मीडियावर महापूर आहे.

आधी केले,मग सांगितले,
आम्हालाही भूमिका मान्य आहे !
टिचभर करून हातभर सांगतात,
त्यांची मात्र खरोखर धन्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9046
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25सप्टेंबर2025
 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...