Wednesday, September 24, 2025

नुकसानीचा पंचनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
नुकसानीचा पंचनामा
किडूक गेले, मिडूक गेले,
पिकाबरोबर माती गेली.
शेतकऱ्यांचे मरण बघून,
जणू धरणी माय सती गेली.
गजबजती घरं गेली,
दाववणीची गुरं ढोरं गेली,
त्यांनी बघायचं कुणाकडं ?
ज्यांची तरणीताठी पोरं गेली.
वैरीण झालेली नदीच,
आता डोळ्यांमध्ये दाटू लागली !
येरे येरे पावसा म्हणायचीही
पोरा सोरांना भीती वाटू लागली !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9045
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24सप्टेंबर2025
 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...