Friday, September 12, 2025

ब्रेक के बाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------
ब्रेक के बाद
टी.व्ही. वरच्या सूत्रधारांना,
एक आणि एकच नाद आहे.
काहीही ससू द्या,
ते ब्रेक के बाद आहे.
ब्रेकच्या आधी उगारतात हात,
ब्रेक के बाद चापट लागते !
आज्जीसुद्धा गोष्ट सांगताना,
आजकाल ब्रेक मागते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका
दैनिक झुंजार नेता
11 मे 2002

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...