आजची वात्रटिका
-------------------
उलटे गणित
अंधश्रद्धा मिरवल्या जात आहेत,
अंधश्रद्धा श्रद्धा ठरवल्या जात आहेत.
अशिक्षितांपेक्षाही सुशिक्षितांकडून,
अंधश्रद्धेचे धडे गिरवल्या जात आहेत.
जशा अंधश्रद्धा मिरवल्या जातात,
तसे त्यांचे उदात्तीकरण केले जाते.
असल्या नसलेल्या सुशिक्षितपणाचे,
अंधश्रद्धांकडून हरण केले जाते.
सत्याचा आरसा दाखवील त्याच्या,
माथी नास्तिकतेचा टिळा असतो !
तमाम अंधश्रद्धांना मात्र,
अस्तिकतेचा पक्का लळा असतो !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9048
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment