आजची वात्रटिका
-------------------
श्रीलंका ते नेपाळ
श्रीलंकेनंतर नेपाळसुद्धा,
जगाला काही सांगू पाहतो आहे.
लोकांच्या मनातील खदखद,
जगासमोर टांगू पाहतो आहे.
जसा जनतेच्या आंदोलनामध्ये,
सोशल मीडियाचा वाटा आहे.
तसा सक्रिय आंदोलकात,
तरुणांचा सहभाग मोठा आहे.
कुणाला वाटते,एक वाक्यता आहे,
कुणाला वाटते एकवाक्यता नाही !
आपल्याकडे असे काही घडण्याची,
सध्या तरी अजिबात शक्यता नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-9031
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10 सप्टेंबर2025

No comments:
Post a Comment