Thursday, September 11, 2025

विकृत बॅनर वॉर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

विकृत बॅनर वॉर

यांच्या उरावर त्यांची,
त्यांच्या उरावर यांची बॅनरबाजी आहे.
बॅनरच्या डिजिटल निष्ठेवरती,
आज-काल जो तो राजी आहे.

पूर्वी बॅनर लावण्याची स्पर्धा होती,
आता बॅनर फाडण्याची स्पर्धा आहे.
यांच्या बॅनरला त्यांचे बॅनर,
आता रोजच नडण्याची स्पर्धा आहे.

जमेल तिथे आणि जमेल तसा,
डिजिटल बॅनरचा बार आहे !
विकृतीकडून विकृतीकडे ,
जात असलेले बॅनर वॉर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9032
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11 सप्टेंबर2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...