Monday, June 30, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 30जून2025वर्ष- पाचवेअंक - 30 वा l पाने -57
पॉलिटिकल गेम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Sunday, June 29, 2025
दैनिक वात्रटिका l 29जून2025वर्ष- पाचवेअंक - 29 वा l पाने -57
शक्ती प्रदर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
शक्ती प्रदर्शन
भक्ती प्रदर्शनापेक्षा,
शक्ती प्रदर्शनावर जोर आहे.
ज्याला त्याला आपल्या,
अस्तित्वाचाच घोर आहे.
भक्तीच्या आडून शक्तीचे,
मोठ्या युक्तीने प्रदर्शन आहे.
तू मोठा की मी मोठा?
सुप्त असे घर्षण आहे.
भक्ती अडून शक्तीचा,
परस्परांना चेक आहे !
तरीही त्यांचाच दावा,
भक्ती आणि शक्ती एक आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8962
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29जून2025
Saturday, June 28, 2025
दैनिक वात्रटिका l 28जून2025वर्ष- पाचवेअंक - 28 वा l पाने -57
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 28जून2025
वर्ष- पाचवे
अंक - 28 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1X_qmSqwk53D5jgkoCiNPyvR70ortElaI/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 100
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
युद्ध प्रसंग.. साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
राजकीय भ्रम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
राजकीय भ्रम
राजकारणाचा निष्कर्ष काढणे,
गडबडीचे आणि घाईचे असते.
राजकारण कुणाचेही असले तरी,
ते आपापल्या सोयीचे असते.
कधी लवकर तर कधी उशिरा,
ज्याची त्याची ट्यूब पेटली जाते.
काळ,वेळ,स्थळ,संदर्भ बदलले की,
उलटी सुलटी भूमिका घेतली जाते.
कधी उलट तर कधी सुलट,
भूमिकांचा क्रम पक्का होत जातो !
समज गैरसमज वाढले की,
जनतेचा भ्रम पक्का होत जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8961
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28जून2025
Friday, June 27, 2025
दैनिक वात्रटिका l 27जून2025वर्ष- पाचवेअंक - 27 वा l पाने -60

सत्तांधता ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
सत्तांधता
सत्ता उतायला लागते,
सत्ता मातायला लागते.
आपल्याच मायाजालात,
सत्ता गुतायला लागते.
सत्ताधारी अंध होतात,
सत्ताधारी धुंद होतात.
सारासार विवेकाचे दरवाजे,
नकळत बंद होतात.
सत्ता बडबडायला लागते,
सत्ता धडधडायला लागते !
सत्ता पेलली नाही की,
सत्ता गडगडायला लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8960
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27जून2025
Thursday, June 26, 2025
दैनिक वात्रटिका l 26जून2025वर्ष- पाचवेअंक - 26 वा l पाने -60
पहिलीपासून इंग्रजी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
माफीनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
माफीनामा
नको ते नको तसे अर्थ,
नको त्याच्या तोंडी घातले जातात.
सगळी मुस्कटदाबी करून,
जाहीर माफीनामे घेतले जातात.
दांभिकता आणि झुंडशाहीचे,
अनैतिक असे सुत आहे.
बळजबरीच्या माफीनाम्यांना,
आजकाल जास्तच ऊत आहे.
माफीमुळे कुणी छोटा होत नाही,
अशी कौतुकाची थाप मारली जाते !
अनैतिक एकीच्या जोरावरती,
सत्याला मात्र धूळ चारली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8959
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26जून2025
Wednesday, June 25, 2025
दैनिक वात्रटिका l 25जून2025वर्ष- पाचवेअंक - 25 वा l पाने -60
राजकीय प्रयोग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
राजकीय प्रयोग
कुणासोबत जावे? कुणासोबत नाही?
सगळ्यांची एकसारखी स्थिती आहे.
तरीही राजकीय जुळवा जुळवीला,
सगळीकडे एकसारखीच गती आहे.
कुणाचे पाय तळ्यात मळ्यात,
कुणाचे दोन्ही डगरीवर हात आहेत.
फासलेले राजकीय प्रयोग,
पुन्हा पुन्हा करायला जात आहेत.
त्यांच्या राजकीय प्रयोगाला,
ना नियम,ना कसल्या अटी आहेत !
वरवरची जुळवा जुळवी तरी,
आतून मात्र फटीच फटी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8958
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25जून2025
Tuesday, June 24, 2025
दैनिक वात्रटिका l 24जून2025वर्ष- पाचवेअंक - 24 वा l पाने -60
भेसळीचे वास्तव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
भेसळीचे वास्तव
विचारांची आणि आचारांची,
मिसळा मिसळ झाली आहे.
राजकीय पक्ष म्हणजे,
सगळी भेसळ झाली आहे.
सगळ्या पक्षीय भेसळीची,
सगळ्यांनाच चटक आहे.
मिसळा मिसळ असली तरी,
जो तो तुटक तुटक आहे.
भेसळीच्या राजकारणाचा,
भैसळीनेच सामना आहे !
सलामत रहे दोस्ताना हमारा,
सर्वपक्षीय कामना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8957
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24जून2025
Monday, June 23, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 23जून2025वर्ष- पाचवेअंक - 23 वा l पाने -60
स्थानिक अडचणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
स्थानिक अडचणी
कुणीही कोणाला भेटू लागले,
कुणीही कुणाला खेटू लागले.
जिकडे बघावे तिकडे,
सर्वपक्षीय संमेलन वाटू लागले.
कुणाकडे काहीच नाही,
कुणा कुणाकडे मात्र हुद्दे आहेत.
ज्याला त्याला स्थानिक अडचणी,
ज्याचे त्याचे स्थानिक मुद्दे आहेत.
त्यांच्या स्थानिक अडचणीवरती,
त्यांचे उपायसुद्धा स्थानिक आहेत !
परस्परांच्या हालचाली बघून,
सगळेच्या सगळे पॅनिक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8956
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23जून2025
Sunday, June 22, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 22 जून2025वर्ष- पाचवेअंक - 22 वा l पाने -60
स्थानिक तडजोडी...... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
भक्तांचे साकडे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
भक्तांचे साकडे
जशी इच्छा इकडे आहे,
तशीच इच्छा तिकडे आहे.
कुणाचे पांडुरंगाला तर,
कुणाचे विठ्ठलाला साकडे आहे.
आपापला जो उप आहे,
तो तो त्यांना मुख्य हवा आहे.
आहे तोच कायम राहील,
असाच भक्तांचा दावा आहे.
काय होईल ? काय नाही?
जो तो अंदाज लावू शकतो !
ज्याच्यावर दिल्ली मेहरबान,
त्यालाच देव पावू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8955
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22जून2025
Saturday, June 21, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 21 जून2025वर्ष- पाचवेअंक - 21 वा l पाने -60
आमची भविष्यवाणी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
आमची भविष्यवाणी
कसले कसले बाबा बघा,
काहीच्या बाही वेंगाडत आहेत.
आपल्या भविष्यवाणीने,
साऱ्या दुनियेलाही तंगाडत आहेत.
जगात कधीही आणि कुठेही,
कसले तरी संकट येणारच आहे.
ज्याचा आरंभ असतो त्याचा,
शेवटही नक्की होणारच आहे.
ज्याची भविष्यवाणी गोल गोल,
त्याच्या भविष्याला बरकत आहे !
प्रत्येकाने शेवटचा दिवस म्हणून,
रोज जगायला काय हरकत आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8954
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21जून2025
Friday, June 20, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 20 जून2025वर्ष- पाचवेअंक - 20 वा l पाने -60
असली नकलीचा घोळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
असली नकलीचा घोळ
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये,
असली नकली चा खेळ आहे.
आम्ही असली, विरोधक नकली,
रोजच त्यांचा घोळात घोळ आहे
कुणा कुणाचा फक्त वायदा आहे,
कुणा कुणाचा फक्त फायदा आहे.
कुणा कुणाचा नेहमीचाच दावा,
आमच्या पाठीशी कायदा आहे.
दाव्यावरती प्रति दाव्याची,
गंमत मात्र भलतीच न्यारी आहे!
त्यांच्या असली नकलीपणाची,
अगदी सेम टू सेम स्टोरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8953
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20जून2025
Thursday, June 19, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 19 जून2025वर्ष- पाचवेअंक - 19 वा l पाने -60
अघोरी मंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
अघोरी मंत्र
कशीही मिळवा सत्ता मिळवा,
सत्तेचा मार्गच अघोरी आहे.
उपाय करा, अपाय करा,
त्याच्यात कसली चोरी आहे ?
म्हणूनच अघोरी मार्गाचीच,
अघोरी अशी विद्या आहे.
जिकडे तिकडे अघोरी प्रकार,
राजकारणात सध्या आहे.
अघोरी आहेत उपाय,
अघोरी त्याचे तंत्र आहे !
सत्तेसाठी वाट्टेल ते...
हाच आजचा अघोरी मंत्र आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8952
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19जून2025
Wednesday, June 18, 2025
दैनिक वात्रटिका l 18 जून2025वर्ष- पाचवेअंक - 18 वा l पाने -60
पक्षांतराचा (बाजार) भाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Tuesday, June 17, 2025
दैनिक वात्रटिका l 17 जून2025वर्ष- पाचवेअंक - 17 वा l पाने -57
पास नापास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
पास नापास
प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर,
पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागतात.
येणारे आणि जाणारेही,
सगळ्यांचीच परीक्षा पाहू लागतात.
निष्ठा निष्ठा असली तरी,
निष्ठा अनेक ठिकाणी वाहिली जाते.
स्वतः कसोटीवर उतरण्यासाठी,
खरी परीक्षा तर जनतेची पाहिली जाते.
आपल्या निष्ठेच्या समर्थनासाठी,
इतरांच्या गद्दारीचे दाखले दिले जातात !
निष्ठेच्या तकलादु कसोटीवर,
कुणी पास किंवा नापास केले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8950
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17जून2025
Monday, June 16, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 16 जून2025वर्ष- पाचवेअंक - 16 वा l पाने -60
अपघातांचा पंचनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
अपघातांचा पंचनामा
काही ओढावून घेतले जातात,
काही जीवावर बेतले जातात.
अपघात अपघात असले तरी,
निष्पापांचे बळी घेतले जातात.
जिथे जातात निष्पापांचे बळी,
ते नक्की कुणाचे तरी पाप असते.
कुणासाठी भ्रष्टाचार वरदान,
निष्पापांसाठी मात्र ते शाप असते.
अतिउत्साह,उन्माद आणि अतिरेक,
हेसुद्धा अपघातांचे कारणं असतात !
सगळ्यांच्याच निष्काळजीपणामुळे,
स्वस्तात लोकांचे मरणं असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8949
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16जून2025
पोरकट वल्गना...... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
Sunday, June 15, 2025
दैनिक वात्रटिका l 15 जून2025वर्ष- पाचवेअंक - 15 वा l पाने -57
पक्षांतराचा उतारा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
पक्षांतराचा उतारा
एरव्ही कार्यकर्ते मस्त असतात,
एरव्ही कार्यकर्ते सुस्त असतात.
निवडणुका जवळ आल्या की,
कार्यकर्ते मात्र अस्वस्थ असतात.
पक्ष कोणताही असला तरी,
सगळ्यांचीच तऱ्हा एक असते.
सगळ्यांच्याच भवितव्यावरती,
अलगद मारलेली मेख असते.
कार्यकर्त्यांकडून अस्वस्थतेवर,
पक्षांतराचा उतारा काढला जातो !
एकच राजकीय पक्ष सुद्धा,
त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा सोडला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8948
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15जून2025
Saturday, June 14, 2025
दैनिक वात्रटिका l 14 जून2025वर्ष- पाचवेअंक - 14वा l पाने -57
सारेच चमत्कारिक !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
सारेच चमत्कारिक !
योगायोग कोणताही असला तरी,
त्यामागे कार्यकारण भाव असतो.
योगायोगाला चमत्कार ठरविणे,
हा तर सुनियोजित असा डाव असतो.
काही चमत्कार तपासता येत नाहीत,
काही चमत्कार तपासून देत नाहीत.
चमत्काराची भांडेफोड होईल म्हणून,
भक्तसुद्धा कोणतीच रिस्क घेत नाहीत.
स्वार्थापोटी चमत्कार करवले जातात,
स्वार्थापोटी चमत्कार मिरवले जातात !
जे करतात चमत्कारांची चिकित्सा,
ते भ्रष्ट आणि नास्तिक ठरवले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8947
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14जून2025
Friday, June 13, 2025
दैनिक वात्रटिका l 13 जून2025वर्ष- पाचवेअंक - 13 वा l पाने -63
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 13 जून2025
वर्ष- पाचवे
अंक - 13 वा l पाने -63
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1PgvNwEDQ9A8DKymu9_RHk4DkZcz2aHF7/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 85
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
गेम प्लॅन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
गेम प्लॅन
सावात चोर आले,
आमची काही हरकत नाही.
पण चोरात साव गेले,
त्याशिवाय जणू बरकत नाही ?
हल्ली चोरांच्या भोवती,
सावांचाच जास्त पिंगा आहे.
त्यांनी चोरांना सामील व्हावे,
ही तर उलटी गंगा आहे.
चोर आणि सावांनाही,
एकमेकांचे भलतेच प्रेम आहे !
दोघांच्या युतीमध्ये,
तुमचा आमचा गेम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8946
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13जून2025
Thursday, June 12, 2025
दैनिक वात्रटिका l 12 जून2025वर्ष- पाचवेअंक - 11 वाआणि 12 वा l पाने -75(जोड अंक)
ऑपरेशन फोडाफोडी
आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...



































