Sunday, April 25, 2021

अर्थांतर

आजची वात्रटिका
---------------------

अर्थांतर

नवे रूप,नवे विक्रम,
कोरोना गाठू लागला.
पॉझिटिव्ह सारखा शब्दही,
निगेटिव्ह वाटू लागला.

माणसाचे सगळे स्वास्थ्य,
छू मंतर करुन टाकले आहे !
कोरोनाने सगळ्याच गोष्टींचे,
अर्थांतर करून टाकले आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6128
दैनिक पुण्यनगरी
25एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...