Saturday, April 17, 2021

कोरोना प्रसारक

आजची वात्रटिका
---------------------

कोरोना प्रसारक

यांचाही चिवडून झाला आहे,
त्यांचाही चिवडून झाला आहे.
जिथे निवडणूका झाल्या,
तिथे कोरोना निवडून आला आहे.

सभा रंगल्या,रॅल्या झिंगल्या,
कोरोनाचा कुठे विचार केला?
विरोधकांच्या अपप्रचारासोबत,
कोरोनाचा प्रसार-प्रचार केला !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6120
दैनिक पुण्यनगरी
17एप्रिल2021

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...