Wednesday, April 14, 2021

बोगस लाभार्थी

आजची वात्रटिका
---------------------

बोगस लाभार्थी

लोक जेवढे बंडल आहेत,
तेवढेच ते स्वार्थी आहेत.
सरकारी योजनांचे आकडे बघा,
किती बोगस लाभार्थी आहेत?

ज्याला जिथे खात येईल,
तिथे तिथे तो खात आहे !
आपल्याच आजूबाजूपासून,
बोगसगिरीची सुरूवात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7572
दैनिक झुंजार नेता
14एप्रिल2021

 

No comments:

आत्मनिर्भरतेचे जुगाड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- आत्मनिर्भरतेचे जुगाड गॅस टंचाईला पर्याय म्हणून, कसले कसले जुगाड सुरू झाले. ज्याला काही कळत नाही ...