Wednesday, April 14, 2021

पूर्वतयारी

आजची वात्रटिका
---------------------

पूर्वतयारी

लॉक डाऊनचा अंदाज येताच,
सगळा जामानिमा करून झाला.
बॅक लॉग आणि फ्रंट लॉग,
कोरोनाकडूनसुद्धा भरून झाला.

कुणाचे हातावर पोटं आहेत,
कुणाचे पोटावर हात आहेत.
जिथे जिथे अविचार आहे,
तिथे तिथे कोरोनाच घात आहेत.

लॉक डाऊनची पूर्वतयारी,
कोरोनकडूनही झाली आहे !
तुम्हीच तुमचे कोरोनायोद्धे,
जो तो स्वतःचा वाली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6117
दैनिक पुण्यनगरी
14एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...