आजची वात्रटिका
---------------------
परीक्षा पे चर्चा
पहिली ते आठवी पाठोपाठ,
नववी आणि अकरावीवाले.
परीक्षेशिवाय कोरोना कृपेने,
अगदी धडाधड पास झाले.
कुणाला पटले नाही,
कुणाला पटणार नाही.
ज्यांना तडजोड मान्य नाही,
त्यांना बरे वाटणार नाही.
ढ आपोआप ढकलले गेले,
हिरमुसलेले स्कॉलर आहेत !
नवे विचार,नवे आचार,
हे कोरोनाचे ट्रेलर आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6111
दैनिक पुण्यनगरी
8एप्रिल2021

No comments:
Post a Comment