Sunday, April 18, 2021

दादागिरी

आजची वात्रटिका
---------------------

दादागिरी

संचार आणि स्वातंत्र्याच्या नावाने,
प्रत्येकजण चेकाळायला लागला.
तसतसा कोरोनासुद्धा,
जास्तच बोकाळायला लागला.

कोरोनाची वाढली दादागिरी,
आज तरी सर्वांचा दादा आहे !
कोरोनाशिवाय काही सूचत नाही,
आयुष्याला त्याची बाधा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7574
दैनिक झुंजार नेता
18एप्रिल2021

 

No comments:

आत्मनिर्भरतेचे जुगाड....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- आत्मनिर्भरतेचे जुगाड गॅस टंचाईला पर्याय म्हणून, कसले कसले जुगाड सुरू झाले. ज्याला काही कळत नाही ...