Friday, April 2, 2021

स्वस्ताईचा फॉर्म्युला

आजची वात्रटिका
---------------------

स्वस्ताईचा फॉर्म्युला

शंभरने वाढलेले गॅस सिलेंडर,
दहा रुपयांनी खाली आले.
सिलेंडर शिट्टी मारीत म्हणाले,
कसे एप्रिल फूल केले?

स्वस्ताईच्या फॉर्म्युलाला,
कोपरापासून वंदन आहे !
त्याचा जाळ होणारच,
बोलून चालून इंधन आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7561
दैनिक झुंजार नेता
2एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...