Sunday, April 18, 2021

मतभेदाचे केंद्र

आजची वात्रटिका
---------------------

मतभेदाचे केंद्र

ते यांच्यावर ढकलू लागले,
हे त्यांच्यावर ढकलू लागले.
कोरोनाग्रस्त मदतीसाठी,
मोठ्याने धाय मोकलू लागले.

तुमच्यावर राज्य आहे,
त्यांच्या मतभेदाचे केंद्र आहे !
जणू दोघांच्याही मनामध्ये,
काहीतरी काळंबेंद्र आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6121
दैनिक पुण्यनगरी
17एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...