Friday, April 9, 2021

राजकीय लसलस


 आजची वात्रटिका

--------------------

राजकीय लसलस

कुठे फसफस सुरू झाली,
कुठे वसवस सुरू झाली.
कोरोनाच्या लसीवरून,
राजकीय लसलस सुरू झाली.

कुठे खरी,कुठे खोटी,
कोरोना लसीची वसवस आहे !
ज्याला विसंगती कळाली,
त्यांची पिकलेली खसखस आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6112
दैनिक पुण्यनगरी
9एप्रिल2021

No comments:

कटू सत्य... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- कटू सत्य तेच सत्य मानले जाते जे आपल्याला रूचले जाते. तेच सत्य पचविले जाते जे आपल्य...