Thursday, April 1, 2021

विकृती

आजची वात्रटिका
---------------------
विकृती
डोक्या-डोक्यात घुसलेली,
विकृतीची घूस आहे.
सडलेल्या मेंदूची,
विकृतीला फूस आहे.
विकृतीची स्विकृती,
सडक्यांची कमी नाही.
वाढती रगेलता सांगते,
दोडक्यांची कमी नाही.
विकृतीला फसू नका,
विकृतीला काबूत ठेवा !
कुणाकडे गहाण नको,
आपले मेंदू शाबूत ठेवा!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6104
दैनिक पुण्यनगरी
1एप्रिल2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...