Friday, April 30, 2021
काव्य इन्फेक्शन
काव्य इन्फेक्शन,आजची वात्रटिका
आजची वात्रटिका
---------------------
काव्य इन्फेक्शन
तू माझा मास्क,
तू माझा पीपीई कीट पण आहे.
मी तुझा सिलेंडर,
तू माझा ऑक्सिजन आहे.
आशा चारोळ्या-बिरोळ्या
आरोळ्या लिहिल्या जात आहेत !
कोरोनाचे दुष्परिणाम असे,
काव्य विश्वावर होत आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6133
दैनिक पुण्यनगरी
30एप्रिल2021
Thursday, April 29, 2021
सॅनिटायझरची नशा
आजची वात्रटिका
---------------------
सॅनिटायझरची नशा
कोरोनाच्या तडाख्यात,
सगळे विचित्र होऊ लागले.
दारू मिळेना म्हणून पेताड,
सॅनिटायझर पिऊ लागले.
सॅनिटायझरचे कॉकटेल,
याला अजिबात तोड नाही!
सॅनिटायझरची नशा चढताच,
जगण्याचाही लोड नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6132
दैनिक पुण्यनगरी
29एप्रिल2021
लसीकरण मोहीम
आजची वात्रटिका
---------------------
लसीकरण मोहीम
मोफतच्या लसीचे वय,
असेच खाली खाली येवो.
कोरोना आहे तोपर्यंत तरी,
शंभर टक्के लसीकरण होवो .
कोरोना गेला,लसीचा डोस दिला,
उद्या अशी म्हणही पडू शकते!
टार्गेट पूर्ण करण्यासाठी,
भविष्यात हेही घडू शकते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7583
दैनिक झुंजार नेता
29एप्रिल2021
Wednesday, April 28, 2021
बॅटचे बोल
आजची वात्रटिका
---------------------
बॅटचे बोल
आउट डोअरचे प्रेक्षक,
कोरोनाने इनडोअर झाले.
प्रेक्षकांशिवाय खेळताना,
मला तर बाई बोअर झाले.
प्रेक्षकांत आणि आपल्यात,
खूप सोशल डिस्टनसिंग आहे !
आऊटडोअरपेक्षा इनडोअरमध्ये,
एक वेगळीच झिंग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7582
दैनिक झुंजार नेता
28एप्रिल2021
टीका आणि टिंगल
आजची वात्रटिका
---------------------
टीका आणि टिंगल
टीका-टिप्पणी जरूर व्हावी,
पण टिंगल टवाळी नको.
जीभेत लवचिकता असावी,
पण धारदार अन लव्हाळी नको.
उचला आणि लावा टाळ्याला,
हे सर्वांनी टाळले पाहिजे !
टीका आणि टवाळकी,
यातले अंतर कळले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6131
दैनिक पुण्यनगरी
28एप्रिल2021
Tuesday, April 27, 2021
कोर्ट-मार्शल
आजची वात्रटिका
---------------------
कोर्ट-मार्शल
आयोगाने घेतल्या निवडणूका,
त्याला कोरोना दौडून आला.
सगळे बसले प्रचार करीत.
त्यात कोरोना निवडून आला.
आज देशातल्या कोरोनात,
आयोगाचा सिंहाचा वाटा आहे !
म्हणूनच आयोगाच्या माथी,
न्यायालयाचा सोटा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7581
दैनिक झुंजार नेता
27एप्रिल2021
घ्या आणि द्या
आजची वात्रटिका
---------------------
घ्या आणि द्या
ऐकून आनंद झाला,
सरसकट मोफत आहे.
मोफतच्या लसीला,
श्रेयवादाची आफत आहे.
अख्खं घ्या,वाटून घ्या,
जसं घ्यायचं तसं घ्या !
वेळेवर आणि सरसकट,
मोफतची लस द्या !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6130
दैनिक पुण्यनगरी
27एप्रिल2021
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)
daily vatratika...29jane2026
आभार प्रदर्शन
गेट-टुगेदर... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...