आजची वात्रटिका
-------------------
मनुष्यत्वाचे व्हेरिफिकेशन
माणसाचे मनुष्यत्व धोक्यात आलेय,
या वास्तवाची खात्री तुम्ही खुद्द करा.
संगणक माणसाला विचारू लागला,
रोबोट नाही;माणूस आहात सिद्ध करा.
सगळीकडेच यांत्रिकता वाढलेली,
त्यामुळे तर माणसाचीच कणव आहे.
उद्या रोबोट आपल्याला म्हणू शकतात,
मी नाही तूच खराखुरा यंत्रमानव आहे.
इमोजी आणि स्माईलीत रमण्यापेक्षा,
मोकळ्या मनाने हॅलो हाय करत चला !
आपल्यात माणूस उरला आहे का?
हे रोजच्या रोज व्हेरिफाय करत चला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9076
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment