आजची वात्रटिका
-------------------
दिवाळीचे स्वागत
परस्परांच्या इज्जतीचा पंचनामा,
अकलेचे लावलेले दिवे आहेत.
आपण काही फुसका फटाका नाही,
प्रत्येकाचेच स्फोटक दावे आहेत.
आपल्या स्वागताच्या तऱ्हाही,
दिवाळीला कळून चुकल्या आहेत.
जातीय द्वेषाच्या सुरसुरी सोबत,
टुचुक टुचुक अशा टिकल्या आहेत.
आरोप आणि प्रत्यारोपांचाही
नुसताच जाळ आणि धूर आहे !
आरक्षण मागण्यांची झाली ढगफुटी,
दिवाळीच्या स्वागताला महापूर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9069
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment