आजची वात्रटिका
-------------------
ज्याला सारासार विवेक आहे,
त्यालाच हे धक्कादायक वाटू शकते.
कशाचाही आणि कुणाच्याही स्पर्शाने,
इथे कधीही काहीही बाटू शकते.
ज्याला कशाला झाली बाटाबाटी,
ते ते सगळे अपवित्र मानले जाते.
जात,धर्म आणि रंगालाही,
साक्षीदार म्हणून मध्ये आणले जाते.
बाटाबाटी एवढीच शुद्धीकरणाचीही,
इथे अगदी सुलभ अशी व्यवस्था आहे !
बाटाबाटी आणि शुद्धीकरणाचीही,
किळस यावा अशीच अवस्था आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9070
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment