आजची वात्रटिका
-------------------
फसवणुकीची कबुली
घोषणा आणि आश्वासनांचे
जनतेला म्हणे व्यसन आहे.
घोषणा आणि आश्वासने,
निवडणुकीतील फॅशन आहे.
जनता फसते तरी सोसते,
नेहमीच कसलातरी नाद आहे.
राजकीय नेत्यांच्या कबुलीला,
आमची खरोखरच दाद आहे.
देणारा आश्वासन देत राहतो,
माहिती असते तो देणार नाही !
जाहिर अपमान झाल्याशिवाय,
जनताही ताळ्यावर येणार नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9061
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment