आजची वात्रटिका
-------------------
ऑल दि बेस्ट
मतदान चोरीच्या प्रझेंटेशनवर,
विरोधकांचा एकच टप्पू आहे.
देशात तर होताच होता पण,
महाराष्ट्रातही एक पप्पू आहे.
कुणावर आरोप?कुणाचे उत्तर?
प्रत्येकाला इशाराही काफी आहे.
मतदान चोरीच्या प्रझेंटेशनची,
म्हणजे सरळ सरळ कॉपी आहे.
आरोपांपासून थेट उत्तरांपर्यंत,
सगळेच जरी कॉपी पेस्ट आहे !
लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी,
सगळेच ऑल दि बेस्ट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9077
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment