Monday, October 6, 2025

अध्यापन पंधरवडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

अध्यापन पंधरवडा

सप्ताह आणि पंधरवड्यांनी,
शाळा शाळात हैदोस घातला आहे.
प्रत्यक्ष अध्यापनाचा वेळ,
नको त्यांनीच हिरावून घेतला आहे.

सप्ताह आणि पंधरवड्यांना,
ऑनलाइन कार्यक्रमांचा शेजार आहे.
डाटा ऑपरेटरची भूमिका करून,
बिचारा शिक्षक मात्र बेजार आहे.

पंधरवडे आणि सप्ताह,
ही अवांतर उद्योगाची झाकी आहे !
कधीतरी यातून वेळ मिळाला तर,
अध्यापन पंधरवडा करणे बाकी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9056
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6ऑक्टोबर2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...