Wednesday, October 8, 2025

खोट्या आत्महत्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

खोट्या आत्महत्या

आरक्षणाच्या मागण्यांचे,
कार्यक्रम तर रेट्या आहेत.
आरक्षणाच्या नावावरच्या,
आत्महत्याही खोट्या आहेत.

जेवढी जखम भळभळती,
तेवढीच जखम खोल आहे.
आरक्षणांच्या मागण्यांसाठी,
जीविताचेही मोल आहे.

कशा कशाचे भांडवल करावे?
याचीही मर्यादा पाळली पाहिजे!
आत्महत्या केलेल्या जीवाची,
टिंगल टवाळी टाळली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9058
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8ऑक्टोबर2025
 

No comments:

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- घुसखोरी खोटे खोटे बोलत रहा, खरे बोलायचीही चोरी आहे. हल्ली जिकडे बघावे तिकडे, घुसखोरी एके घुसखोरी...