आजची वात्रटिका
-------------------
फंडे आणि गुंडे
आधुनिक राजकारणाचे,
अत्याधुनिक फंडे आहेत.
पक्षात आले पवित्र केले,
जिकडे तिकडे गुंडे आहेत.
विरोधकातच गुंडे आहेत,
पक्ष पक्षात कंड्या आहेत.
जणू गुंडांच्या हातामध्ये,
पक्ष पक्षाच्या गुंड्या आहेत.
याचाही नीट अंदाज नाही,
कोण कुणाला नाचवतो आहे?
कुणाच्या पाठीशी कोण?
कोण कुणाला वाचवतो आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9062
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment