Sunday, October 5, 2025

राजकीय पोलखोल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

राजकीय पोलखोल

राहून राहून सगळेच,
बिनधास्तपणे बोलू लागले.
एकमेकांचे झाकलेले गुपित,
जगजाहीरपणे खोलू लागले.

परस्परांच्या गुपितांना,
त्यांची परस्परांची साक्ष आहे.
आज फरक एवढाच की,
त्यांचा वेळवेगळा पक्ष आहे.

परस्परांच्या इज्जतीची,
परस्परांकडून पोलखोल आहे !
वरून कोरड्या जखमेला,
आतून चांगलीच ओल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9055
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5ऑक्टोबर2025
 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...