Sunday, October 26, 2025

मोर्चांची सिद्धता.... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
----------------------------

मोर्चांची सिद्धता

पावसाचा शेतकऱ्यांवर मोर्चा,
विरोधकांचा सरकारवर मोर्चा आहे.
आता जिकडे बघावे तिकडे, 
सगळीकडेच मोर्चाचीच  चर्चा आहे.

आपापल्या शक्ती प्रदर्शनासाठी, 
ज्यांची त्यांची मोर्चाची युक्ती आहे !
चर्चा आणि मोर्चातून सिद्ध व्हावे,
तुमची शेतकऱ्यांवर भक्ती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 6
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
26ऑक्टोबर2025

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...