आजची वात्रटिका
----------------------------
काळी दिवाळी
विरोधकांकडून दिवाळीला,
दरवर्षी नवे नवे नाव असते.
दिवाळीचा शिमगा करण्यासाठी
विरोधकांची धावाधाव असते.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर,
विरोधक शिमगा खेळत असतात !
आपली राजकीय सोय बघून,
विरोधक दिवाळी पाळत असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका
दैनिक मराठवाडा नेता
18ऑक्टोबर2025
----------------------------
No comments:
Post a Comment