Saturday, October 25, 2025

आरक्षणाचे अंकगणित...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आरक्षणाचे अंकगणित

आरक्षणाच्या सोडतीवर,
राजकीय चक्र फिरू लागते.
सगळी बेरीज आणि वजाबाकी,
परस्परांचे हात धरू लागते.

कुठे कुठे हातचा सोडावा लागतो,
कुठे कुठे हातचा धरावा लागतो.
साध्या सरळ अंकगणितापेक्षाही,
वेगळाच विचार करावा लागतो.

आरक्षणाचे संरक्षण असले तरी,
वेगळी यंत्रणाही असावी लागते !
गुणाकार भागाकार झाले तरी,
अपेक्षित बेरीज दिसावी लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9073
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर2025
 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...