साप्ताहिक
वात्रटिका
---------------------
अशी ही फेकाफेकी
कुठे फेकला गेला बूट,
कुठे पुस्तके फेकली गेली.
कुणी केली टिंगल टवाळी,
कुठे खसखस पिकली गेली.
अन्यायाच्या तक्रारीत,
बदनामीचा आळ आहे.
सगळ्या फेकाफेकीत.
कट्टरतेचीच नाळ आहे.
देऊळ आणि धर्माभोवती,
फेकाफेकी फिरते आहे !
एकाचे बघून दुसऱ्याची,
फेकाफेकी जोर धरते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
साप्ताहिक सरकारनामा
11ऑक्टोबर 2025
No comments:
Post a Comment