Monday, October 27, 2025

डिफेंडरचा कारनामा..... आजची वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------

डिफेंडरचा कारनामा

एकमेकांना डिफेंड करण्याचा,
त्यांचा परस्परांकडे गुत्ता आहे.
तोच  मास्टर डिफेंडर ठरतो,
ज्याच्या पाठीशी सत्ता आहे.

सत्तेच्या  राजकारणाची,
ही चालती बोलती फॅक्ट आहे !
बचेंगे तो और भी लढेंगे..
हीच आजची राजकीय टॅक्ट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 7
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
27ऑक्टोबर2025
----------------------------

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...