Saturday, October 25, 2025

आरक्षणाचे लोण..... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
----------------------------

आरक्षणाचे लोण

त्यांचे त्यांनाच कळत नाही, 
बाजूने आणि विरोधात कोण आहे?
नको तसे नको तिकडे,
आरक्षणाच्या मागण्यांचे लोण आहे.

विरोधक विरुद्ध विरोधक आहेत, 
सरकार विरुद्धच सरकार आहे.
आरक्षणाच्या मागणी पुढे, 
कुठे कुणाला कुणाची दरकार आहे?

आरक्षण बचाव..हटाव आणि मिटाव...
अशा परस्पर विरोधी मागण्या आहेत !
कुठे धडाडत आहेत तोफा, 
कुठे मात्र स्वतःलाच डागण्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
25ऑक्टोबर 2025
---------------------------
*सूर्यकांती लाईव्ह*
https://youtube.com/@suryakantdolase?si=hpJyNj9dKeLbPNvO

*लाईक...कमेंट... शेअर अँड सबस्क्राईब*

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...