Tuesday, October 21, 2025

राजकीय फटाकडे...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय फटाकडे
गटा तटात भिरभिरती भुईचक्रं,
कुणी मामा आणि मामी आहे.
फुसक्यांच्या लडी जरा जास्तच,
ॲटम बॉम्बची संख्या कमी आहे.
लवंगी,बाण आणि रेल्वे बघत,
तुडतुडणारा फुलबाजा आहे !
फटाक्याबरोबर फटाकड्यांचाही,
आता रात्रंदिवस गाजावाजा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका
दैनिक मराठवाडा नेता
21ऑक्टोबर2025

 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...