आजची वात्रटिका
-------------------
राडेशाही
आमदारा विरुद्ध आमदार लढतो आहे,
खासदाराविरुद्ध खासदार लढतो आहे.
हे नेमके कुणाचे प्रतिनिधी आहेत ?
प्रश्न मात्र सामान्य जनतेला पडतो आहे.
आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी,
लोकप्रतिनिधींची जाहीर लढाई आहे.
सगळे काही सामान्य जनतेसाठी,
लोकप्रतिनिधींची जाहीर बढाई आहे.
सभागृहामधला वाद समजू शकतो,
लोकप्रतिनिधींचा रस्त्यावर राडा आहे !
लोकशाहीला वेठीस धरून,
त्यांच्याकडून लोकशाहीला धडा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9074
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment