Wednesday, October 22, 2025

मार्ग आडमार्ग....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

मार्ग आडमार्ग

कधी भक्तीने लढवल्या जातात,
कधी शक्तीने लढवल्या जातात,
भक्ती आणि शक्ती पेक्षा जास्त,
निवडणुका युक्तीने लढवल्या जातात.

भक्ती,शक्ती आणि युक्तीचा,
जेव्हा त्रिवेणी संगम साधला जातो.
तेव्हा मैत्रीपूर्ण लढती ऐवजी,
बिनविरोधचा मार्ग शोधला जातो.

निवडणुकीत कधी काय चालेल?
याचा कधी अंदाज लावता येत नाही !
त्याने निवडणूकच लढवू नये,
ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9072
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22ऑक्टोबर2025
 

No comments:

कळपाचा विजय असो !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कळपाचा विजय असो ! एकदा मेंदू गहाण ठेवला गेला की, मग विचार करायचेच राहिले जाते. विषय कोणताही असला...