Wednesday, October 29, 2025

आठवा वेतन आयोग...,. आजची वात्रटिका


आजची वात्रटिका 
----------------------------

आठवा वेतन आयोग

दिल्लीत जाहीर झाला तरी,
गल्लीमध्ये पेढे वाटू लागले. 
पगाराचा हिशोब करता करता,
कॅल्क्युलेटर मात्र फुटू लागले.

केंद्रातला असो वा राज्यातला, 
कर्मचारी तर जगला पाहिजे !
किमान पगाराचा आणि कामाचा, 
योग्य ताळमेळ लागला पाहिजे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 9
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
29ऑक्टोबर2025

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...