आजची वात्रटिका
-------------------
वाचाळतेचे कारण
गचाळाहून गचाळ आहेत,
वाचाळाहून वाचाळ आहेत.
राजकीय पार्टी पार्टीमध्ये,
सगळीकडेच कुचाळ आहेत.
वाचाळाविरुद्ध वाचाळ,
आज उभे ठाकले आहेत.
मीडिया कव्हरेज मुळे,
सगळेच वाचाळ सोकले आहेत.
वाचाळ आणि कुचाळही
सगळेच आज फॉर्मात आहे !
त्यांनी उधळलेली मुक्ताफळे,
तुमच्या आमच्या कर्मात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9052
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment