Sunday, October 19, 2025

जातीय 'मोर्चे' बांधणी.......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 
----------------------------

जातीय  'मोर्चे' बांधणी

जात जातीला भेटू लागली, 
जात जातीला खेटू लागली.
प्रवर्गाचे लेबल लावून, 
आरक्षणाची मागणी रेटू लागली.

कुठे जाती-जातीत दोस्ती आहे, 
कुठे जाती जातीत कुस्ती आहे !
कुणीही वापरतो आणि फेकून देतो, 
एवढी जात आज सस्ती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका
दैनिक मराठवाडा नेता
19ऑक्टोबर2025

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...