आजची वात्रटिका
-------------------
पण लक्षात कोण घेतो?
प्रचार आहे की अपप्रचार?
लोकांसमोर प्रश्न उभा आहे.
बघा कसले कसले मोर्चे?
बघा कसली कसली सभा आहे ?
कुणी आग लावे,कुणी तेल घाले,
नेमके तेच आज फॉर्मात आहेत.
अजून कसले कसले दिवस?
सामान्य जनतेच्या कर्मात आहेत?
माजोरांचा हंगाम तेजीत आहे,
त्यांना गरजे पोटी मातले पाहिजे !
पेटविणे सोपे,विझविणे अवघड,
सगळ्यांनीच लक्षात घेतले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9065
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment