Thursday, October 2, 2025

दसरा आणि गांधी जयंती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

दसरा आणि गांधी जयंती

जसा रावण पुन्हा पुन्हा जाळला जातो,
तसा गांधीही पुन्हा पुन्हा मारला जातो.
एकाच्या मृत्यूचा होतो सोहळा,
दुसऱ्याचा मात्र वादग्रस्त ठरला जातो.

म्हणूनच गांधी जयंती आणि दसरा,
यंदा वेगळाच शोध आणि बोध आहे.
ज्यांनी केली हत्या ते म्हणतात,
यांचा आणि त्यांचासुद्धा वध आहे.

एकाला ठरविले गेले दुराग्रही,
दुसरा सत्याग्रही आणि हट्टी आहे !
दोन ऑक्टोबरला झालेल्या युतीमध्ये,
शहीद मात्र सरकारी सुट्टी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9053
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 ऑक्टोबर2025
 

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...