Tuesday, October 21, 2025

महाराष्ट्रातील नाट्य प्रयोग....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
महाराष्ट्रातील नाट्य प्रयोग
जसा नेहमीच असतो तमाशा,
तसे कधी कधी नाटक आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला,
मराठी नाटकाची चटक आहे.
तरुण तुर्क म्हातारे अर्क तरी,
संशयकल्लोळ माजलेला आहे.
इथे सखाराम बाईंडर सोबत,
घाशीराम कोतवाल रुजलेला आहे.
तो मी नव्हेच ला तर ....
हाऊस फुल्लची संधी आहे !
जिथे रंगली होती भाऊबंदकी,
तिथेच मनोमिलनाची नांदी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9071
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21ऑक्टोबर2025
 

No comments:

राज्यसभेची तुतारी .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राज्यसभेची तुतारी विलीनीकरण होणार की नाही? प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे. त्यांच्या टारगेटव...