Saturday, October 4, 2025

ताल बेताल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

ताल बेताल

इकडेही बेताल आहेत,
तिकडेही बेताल आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
अगदी सारखेच हाल आहेत.

एकाच्या बेतालपणामुळे,
दुसऱ्याचा बेताल वाढतो आहे.
एकमेकांचा बेतालपणा,
त्यांना परस्परांना नडतो आहे.

बेतालपणा एवढा की,
गिरे तो भी टांग उपर आहे !
आपल्या बेतालपणाचे,
दुसऱ्याच्या माथी खापर आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9054
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4ऑक्टोबर2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...