आजची वात्रटिका
-------------------
असमर्थनीय
पाहिजे त्यांची दातखिळी बसली,
त्यामुळेच अंधभक्त बोलू लागले.
असले जरी नकटे नाक तरी,
तेच नाकाने कांदे सोलू लागले.
नाकात शिरता वारे त्यांच्या,
अंधभक्त बेलगाम होऊ लागले.
आपलीच लाल आहे म्हणीत,
अंधभक्त खुलेआम गाऊ लागले.
अंधभक्तच अंधभक्तांना,
आंधळे समर्थन देऊ लागले !
जिकडे तिकडे दांभिकतेचेच,
वेंधळे समर्थन होऊ लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9078
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment