Monday, October 20, 2025

डबल गेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

डबल गेम

राजकीय कार्यकर्त्यांच्या पिढ्या,
दर पंचवार्षिकलाच गाडू लागले.
त्यामुळेच स्वबळाच्या खुमखुमीचे,
आवाज जरा जास्तच वाढू लागले.

कार्यकर्त्यांच्या हट्टामधूनच,
पक्षीय हट्टद्धा पुरवले जातात !
उघड आणि छुपे लढवून,
कार्यकर्त्यांचे कंड जिरवले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका
दैनिक मराठवाडा नेता
20ऑक्टोबर2025
 

No comments:

विश्वास अविश्वास....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- विश्वास अविश्वास सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेदाचे, सगळेच्या सगळे मार्ग धुंडले जातात. निवडून आलेले...