आजची वात्रटिका
-------------------
टीईटी..टेट
नेट..सेट गो.... नंतर
गुरुजींसाठी टेट आहे.
तुघलकी फर्मानावाल्यांना,
त्यात काय नेट आहे?
पाहिजे तसे फर्मान काढा,
पाहिजे तसे छंद करा.
शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम,
टेट अगोदर बंद करा.
जमाना बदलतोय,
अपडेटची रास्त अपेक्षा आहे !
ज्यांनी क्रॅक केल्यात परीक्षा,
त्यांची पुन्हा उपेक्षा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9060
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10ऑक्टोबर2025

No comments:
Post a Comment