Thursday, October 16, 2025

निवडणूक आरक्षण ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

निवडणूक आरक्षण

निवडणूक आरक्षणावर,
राजकीय तोडगे असतात.
कुणी काहीही म्हटले तरी,
ते सगळेच कोडगे असतात.

निवडणूक आरक्षणाला,
राजकीय शह दिला जातो.
सरळ उपाय नसल्यामुळे,
आडवा उपाय केला जातो.

नैतिक अनैतिक मार्ग शोधीत,
आरक्षण ड्रॉ पाळला जातो !
ज्याच्या पडते जखमेवर मीठ,
तो तर जास्तच पोळला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9066
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16ऑक्टोबर2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...