साप्ताहिक
वात्रटिका
---------------------
दुष्काळाची अपेक्षा
शेतकऱ्यांचे ओले दुःख,
मलमपट्टीने सुकत नाही
दुष्काळाचे राजकारण,
कुणाकडून चुकत नाही.
कधी दुष्काळ ओला,
कधी दुष्काळ कोरडा असतो.
दुष्काळग्रस्तांपेक्षाही मोठा,
राजकीय ओरडा असतो.
जिथे अंधार दिसेल तिथे,
स्वतःचा दिवा लावत चला !
मरणा आणि सरणापासून,
राजकारण बाजूला ठेवत चला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
साप्ताहिक सरकारनामा
4ऑक्टोबर 2025
No comments:
Post a Comment