आजची वात्रटिका
-------------------
निष्ठावंत कार्यकर्त्यांनो ....
आम्ही कितीही बोंबललोत तरी,
आमचे विचार कधी पटू शकतात?
कितीही टोकाचे विरोधक असले तरी,
नेत्यांचे मतभेद कधीही मिटू शकतात.
आपल्या राजकीय फायद्यापोटी,
त्यांना वेळोवेळी यु टर्न घ्यावे लागतात.
तुमच्यासारख्या चिल्लर चाल्लरांचे,
त्यांना वेळोवेळी बळी द्यावे लागतात.
निष्ठावंत व्हा, कट्टर व्हा, सच्चे व्हा,
पण स्वतःचे राजकीय बळी देऊ नका !
नेत्यांचे राजकीय वैर कधीही संपते,
तुम्ही मात्र खानदानी वैरी होऊ नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9075
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27ऑक्टोबर2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 4 जून 2026...वर्ष- सहावे ..अंक - 3 रा l पाने -54
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment